मोहम्मद शमीचा मोठा खुलासा
मोहम्मद शमी नावाच्या वादळात वर्ल्ड कपमधील अनेक खेळाडू बेपत्ता झाले होते. 7 सामन्यात 24 विकेट घेऊन मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) धुरळा उडवला होता. त्याचबरोबर शमीने (Mohammed Shami) यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अनेक रेकॉर्ड देखील मोडीस काढले आहेत. शमीला यंदाच्या वर्ल्ड कपमधील पहिल्या 4 सामन्यात संधी मिळाली नव्हती. अशातच आता याच मुद्द्यावरून मोहम्मद शमीने मोठा खुलासा केला आहे.
वर्ल्ड कप (World Cup 2023) सुरू
होण्यापूर्वी मला सांगण्यात आलं होतं की,
मी पहिल्या
सामन्यापासून खेळणार आहे. पण मला पहिल्या तीन आणि त्यानंतर चौथ्या सामन्यात देखील
संधी मिळाली नाही. तेव्हा मला वाटलं की काहीतरी गडबड आहे, असा खुलासा शमीने केला
आहे. जेव्हा मी संघ पाहतो तेव्हा असं वाटतं की प्रत्येकजण चांगली कामगिरी करतोय.
या काळात तुम्हाला मानसिकदृष्ट्या खंबीर राहावं लागतं. तुमच्या मनावर नियंत्रण
ठेवावं लागेल, असं शमीने
म्हटलं आहे.
मी खेड्यातील माणूस आहे आणि म्हणून मी माझी पार्श्वभूमी लक्षात ठेवतो. मी कधीच पिच पाहायला जात नाही, पिच पाहून त्याचा दबाव का घ्यायचा? असा सवाल देखील मोहम्मद शमीने विचारला आहे. त्यावेळी शमीने त्याची बालपणीची आठवण देखील सांगितली. लहानपणी मला आश्चर्य वाटायचं की, लोक भर उन्हात क्रिकेट का खेळतात? मी निवांत मी आंब्याच्या बागेत आंबे खात बसून मॅच बघायचो, असं म्हणत त्याने आठवणींना उजाळा दिला आहे.
प्यूमा इंडियाशी
बोलताना शमीने 2015 च्या वर्ल्ड कपची आठवण देखील सांगितली. 2015 च्या
वर्ल्ड कपपूर्वी माझ्या गुडघ्याला सूज आली होती. त्यावेळी माझ्याकडे फक्त 2 पर्याय
होते. एक म्हणजे मी जाऊन वर्ल्ड कप सोडून शस्त्रक्रिया करावी आणि दुसरं म्हणजे
वर्ल्ड कप खेळावा. मी दुसरा पर्याय निवडला. देशासाठी खेळण्याची संधी कोण सोडेल का? मी
प्रत्येक सामन्यानंतर हॉस्पिटलला जाऊन इंजेक्शन घेत होतो, असा
खुलासा शमीने केला आहे.
दरम्यान, सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 7 विकेट घेत शमीने इतिहास रचला.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7 विकेट घेणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात 50 विकेट पूर्ण करणारा खेळाडू म्हणजे मोहम्मद शमी... 2015 चा वर्ल्ड कप असो वा 2019 चा वर्ल्ड कप... तिन्ही वर्ल्ड कपमध्ये शमीने अद्वितिय बॉलिंग केलीये. आयपीएलमध्ये पर्पल कॅप पटकवणारे अनेक असतील. पण देशासाठी विकेट्स खोलणारा एकच होता.. मोहम्मद शमी...!
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) याने कर्तृत्वाने आणि परिश्रमाने मैलाचा दगड रोवला आहे. आयुष्यातील वादळांचा सामना करत शमी टीम इंडियासाठी संकटमोचक ठरला. पांड्याला दुखापत झाली अन् संघात शमीची एन्ट्री झाली. शमीने विकेट्सचा सपाटा लावला अन् टीम इंडियासाठी वर्ल्ड कप फायनलचं दार उघडं केलं. अशातच आता वर्ल्ड कप फायनलआधीच मोहम्मद शमीला खास गिफ्ट मिळालं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोहम्मद शमीला वर्ल्ड कप 2023 मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी मोठी भेट दिलीये.
मोहम्मद शमीच्या मूळ
गाव अमरोहा येथील सहसपूर अलीनगरमध्ये एक मिनी स्टेडियम बांधण्याची घोषणा योगी
सरकारने केली आहे. प्रशासनाच्या या घोषणेनंतर गावातील नागरिकांमध्ये आनंदाचं
वातावरण पहायला मिळतंय. सीडीओ अश्वनी कुमार मिश्रा आणि इतर अधिकाऱ्यांनी जोया
विकास ब्लॉकमध्ये असलेल्या शमीच्या गावाला भेट दिली. स्टेडियमसाठी जागेचा शोध घेऊन
अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले आहेत.
हसीन जहाँने पोलीस तक्रार केल्यापासून तिच्यात आणि मोहम्मद शमी यांच्यात कायदेशीर लढा सुरु आहे. मोहम्मद शमीने कौटुंबिक हिसाचार केल्याचा तसंच विवाहबाह्य संबंध असल्याचा हसीन जहाँचा आरोप आहे.
वर्ल्डकपमध्ये भारतीय जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी भलत्याच फॉर्ममध्ये आहे. वर्ल्डकपमध्ये त्याने आतापर्यंत 23 विकेट्स घेतले आहेत. एकीकडे मैदानावर मोहम्मद शमी आपल्या गोलंदाजीने वादळ निर्माण करत असताना दुसरीकडे पत्नी हसीन जहाँ त्याच्यावर वेगवेगळी भाष्य करताना दिसत आहे. तो जितका चांगला खेळाडू आहे, तितकाच चांगला पती आणि पिता असता तर बरं झालं असतं असं तिने म्हटलं आहे. पत्नी हसीन जहाँने कौटुंबिक हिसाचार आणि विवाहबाह्य संबंधांचा आरोप केल्याने मोहम्मद शमी तिच्यापासून वेगळा झाला होता.
"तो जितका चांगला खेळाडू आहे तितकाच
चांगला माणूसही असता तर आमचं आयुष्य फार चांगलं असतं. जर तो एक चांगली व्यक्ती
असता तर माझी मुलगी, माझा पती आणि मी एक सुखी आयुष्य जगलो
असतो. तो केवळ एक चांगला खेळाडू नसून एक चांगला नवरा आणि एक चांगला पिताही असता तर
ती अधिक आदराची आणि सन्मानाची बाब असती," असं हसीन जहाँ म्हणाली आहे.
दरम्यान मोहम्मद शमीने न्यूझीलंडविरोधातील सामन्यात 7 विकेट घेत रेकॉर्ड
मोडल्याबद्दल काय वाटतं असंही हसीन जहाँला विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना ती म्हणाली की, "मला काहीच विशेष वाटत नाही. पण भारतीय संघाने सेमी-फायनल जिंकली याचा आनंद आहे. भारतीय संघाने फायनलही जिंकावी अशी माझी प्रार्थना आहे".
मोहम्मद शमीला अभिनयातून राजकारणात
गेलेल्या पायल घोषने लग्नाचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर तिने म्हटलं की, "सेलिब्रिटींसह अशा गोष्टी होत असतात. ही
सामान्य बाब आहे. मला त्यावर काही बोलायचं नाही".
हसीन जहाँने पोलीस तक्रार केल्यापासून तिच्यात आणि मोहम्मद शमी यांच्यात कायदेशीर लढा सुरु आहे. मोहम्मद शमीने कौटुंबिक हिसाचार केल्याचा तसंच विवाहबाह्य संबंध असल्याचा हसीन जहाँचा आरोप आहे. यानंतर शमीवर कौटुंबिक अत्याचार आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप लावण्यात आला होता.
हसीन जहाँने आरोप केला आहे की, मोहम्मद शमी आणि त्याच्या कुटुंबाने आपण
जेव्हा कधी उत्तर प्रदेशच्या घरी गेलो तेव्हा अत्याचार केला. पण मोहम्मद शमीने
नेहमीच हे आरोप फेटाळून लावले आहेत. आपली बदनामी करण्याचा हा कट असल्याचं त्याने
सांगितलं आहे. सप्टेंबरमध्ये विश्वचषक सुरू होण्यापूर्वी शमी कोलकाता येथील
स्थानिक न्यायालयात हजर झाला होता. यावेळी त्याला हसीन जहाँने 2018 मध्ये दाखल केलेल्या घरगुती हिंसाचार
प्रकरणात जामीन मिळाला होता.








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा