🏏 इंग्लंडचा संघ फलंदाजीला न येताही त्यांना फ्री मिळाल्या 5 धावा; जाणून घ्या नेमके प्रकरण काय?
💁♂️ भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी राजकोट येथे खेळली जात असून या सामन्यात भारत प्रथम फलंदाजी करत आहे. रवींद्र जडेजा आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या शतकाच्या जोरावर भारत मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत आहे.
ℹ️ या डावादरम्यान अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनने मोठी चूक केली आहे. याचे परिणाम संपूर्ण संघाला भोगावे लागले आहेत. रविचंद्रन अश्विन फलंदाजी करत असताना 102 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अश्विनने ही चूक केली. यासाठी पंचांनी भारतीय संघावर 5 धावांचा दंड ठोठावला आहे.
🤔 नेमके प्रकरण काय?
▪️ इंग्लंडचा गोलंदाज रेहान अहमद 102 वे षटक टाकायला आला होता. यादरम्यान अहमदच्या षटकातील चौथ्या चेंडूवर रविचंद्रन अश्विनने चेंडूवर फटका मारला आणि एकेरी धाव घेतली.
▪️ या वेळी खेळाडूने चूक केली. अश्विनने खेळपट्टीच्या मध्यातून धावायला सुरुवात केली. कोणत्याही खेळाडूला खेळपट्टीच्या मध्यातून धावण्याची परवानगी नाही, यामुळे खेळपट्टीचे नुकसान होते.
▪️ असे असूनही, अश्विनने एकेरी घेण्यासाठी खेळपट्टीच्या मध्यभागी धावायला सुरुवात केली, त्यामुळे पंच जोएल विल्सन यांनी भारतीय संघावर 5 धावांचा दंड ठोठावला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा