शनिवार, १७ फेब्रुवारी, २०२४

💥 मोठी बातमी : या नोंदी असणाऱ्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती!!



 💥 मोठी बातमी : या नोंदी असणाऱ्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती!!

💁‍♂️ मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेवर तातडीने अंमलबजावणी केली जावी या प्रमुख मागणीसाठी गेल्या 7 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण चालू केलं आहे. 


ℹ️ या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्यावर आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करण्यात आली आहे.



🗣️ मुख्यमंत्री यावेळी म्हणाले: 


▪️ मराठा सर्वेक्षण अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अहवाल सुपूर्द करण्यात आला असून या अहवालावर विशेष अधिवेशनात मांडण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.


▪️ तसेच मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असून ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही, असंही आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.


▪️ यासोबतच महत्त्वाचे म्हणजे जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.


▪️ पुढे बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले कि 1967 पूर्वीच्या जुन्या कुणबी नोंदी त्याचा वेगळा नियम आणि कायदा आहे. नवे मराठा आरक्षण हे कोणत्याही नोंदी नसणाऱ्यांना मिळणार आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजेच मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात येणार आहे.


📍 दरम्यान, मराठा आरक्षणासाठी येत्या 20 फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

For detailed information you may visit SEO Rajsandesh's Unique Webtools at https://onlinetoolmarket.blogspot.com/.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ऍपल Spotify च्या स्ट्रिमिंग म्युझिक मार्केटमधील कथित स्पर्धात्मक पद्धतींबद्दल युरोपियन कमिशनकडे केलेल्या तक्रारीविरूद्ध वाद घालत आहे.

ऍपल Spotify च्या स्ट्रिमिंग म्युझिक मार्केटमधील कथित स्पर्धात्मक पद्धतींबद्दल युरोपियन कमिशनकडे केलेल्या तक्रारीविरूद्ध वाद घालत आहे. स...