शनिवार, १७ फेब्रुवारी, २०२४

गुहागरमध्ये भाजप- ठाकरे गट आक्रमक; राणेंच्या ताफ्यावर दगडफेक तर जाधवांच्या कार्यालयाबाहेर राडा



 गुहागरमध्ये भाजप- ठाकरे गट आक्रमक; राणेंच्या ताफ्यावर दगडफेक तर जाधवांच्या कार्यालयाबाहेर राडा


Nilesh Rane Guhagar : आज माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane Guhagar) गुहागरमध्ये सभा होणार आहे. त्या अगोदरच गुहागरमध्ये भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोरून जात असताना निलेश राणे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली.  



यावेळी परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून हा जमाव हटवण्याचा प्रयत्न केला. निलेश राणे यांची आज सायंकाळी भास्कर जाधव यांचा मतदारसंघ असलेल्या गुहागरमधील तळी या ठिकाणी सभा होत आहे. तर गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधव आणि राणे पिता पुत्र हे एकमेकांवर टीका-टिप्पणी करताना दिसून येत आहेत. त्याच दरम्यान निलेश राणे हे जाधव यांना उत्तर देण्यासाठी या सभेचे आयोजन करत असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. मात्र त्या अगोदरच राणे आणि जाधव यांच्या समर्थकांमध्ये चांगलाच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळालं.


गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधव आणि राणे कुटुंबीय यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. त्यापूर्वीच भास्कर जाधव यांना धमकीचे फोन आणि मेसेज आल्याने जाधव यांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रत्नागिरी पोलीस दक्षता घेत आहेत.


काय आहे नेमकं प्रकरण?


केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना थेट व्यासपीठावरूनच धमकी दिली होती. राणे म्हणाले होते की, कुणीतरी भाडोत्री भास्कर आणतात आणि सांगतात बोला राणेंविरुद्ध. ते काहीही बोलतील मी काय त्याला उत्तर देणार आहे का? मात्र एक दिवस चोप नक्की देणार. सोडणार नाही त्याला. मी असं सोडत नाही. तसेच त्याने निवडणुकीमध्ये प्रचारासाठी माझ्याकडून 15 लाख रुपये घेतले अद्यापही ते परत केलेले नाहीत. तसेच त्याला तिकीटही मीच दिलं.


बाळासाहेबांना सांगून खेडेकरला बाद करून भास्कर जाधवला तिकीट दिलं. त्यानंतर तो माझ्या घरी आला आणि म्हणाला साहेब प्रचाराला पैसे नाही. त्यावेळी एकदा दहा लाख आणि एकदा पाच लाख असे पंधरा लाख मी त्याला दिले. अद्याप पर्यंत ते पैसे परत दिलेले नाही आणि वरून माझ्यावरती ते टीका करतात. असे अनेक जण आहेत. पण मला काही फरक पडत नाही. मी समर्थ आहे. उत्तर द्यायला आणि त्याला अद्दल घडवायला.


दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे पार पडलेल्या सभेमध्ये भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांच्यावर जरी टीका केली होती. जाधव म्हणाले होते की, नेपाळी वॉचमनचा मुलगा दम देतो. शिवाय जाधवांनी प्राण्यांचे नाव न घेता कोंबडी चोर असा उल्लेख केला होता. तर उद्धव ठाकरेंना धोका दिला त्यांना धडा शिकवा. असेही भास्कर जाधव या भाषणात म्हणाले होते. 

For detailed information you may visit SEO Rajsandesh's Unique Webtools at https://onlinetoolmarket.blogspot.com/.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ऍपल Spotify च्या स्ट्रिमिंग म्युझिक मार्केटमधील कथित स्पर्धात्मक पद्धतींबद्दल युरोपियन कमिशनकडे केलेल्या तक्रारीविरूद्ध वाद घालत आहे.

ऍपल Spotify च्या स्ट्रिमिंग म्युझिक मार्केटमधील कथित स्पर्धात्मक पद्धतींबद्दल युरोपियन कमिशनकडे केलेल्या तक्रारीविरूद्ध वाद घालत आहे. स...